Thursday, December 24, 2009

सद्ध्या ( नवीन प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून ) वजन अंमळ जास्तच वाढले आहे. परिणामी जाणवलेले काही बदल नोंदवत आहे.
१. चालताना पोटाभोवती काहीतरी सैलसरपणे बांधले आहे असे वाटायला लागते. व पावलागणीक त्याची होणारी हालचाल जाणवू लागते.

२. सुरुवातीला पोट आत ओढून घेऊन वाढलेले पोट झाकण्याचा प्रयत्न होतो. पण काही दिवसांनी हा प्रयत्न सोडून दिला जातो.

३. आपल्या रुबाबदारपणाबद्दलचे आपले मत हळू हळू बदलू लागते.

४. चालताना एक प्रकारचे जडत्व आल्यासारखे वाटते. आणि परिणामी चालणे आणखीनच कमी होते.

५. मनाचा हिय्या करून व्यायामाला सुरुवात होते, पण बहुतकरून काही दिवसांतच पहिले पाढे पंचावन्न होवून तोही बंद पडतो.

६. जसजसे वजन वाढू लागते, तस तसे सतत काही ना काही खाण्याची इच्छा आणखीनच वाढते.

No comments:

Post a Comment