Friday, November 26, 2010

काही रेखाटने

टीपः याआधी ही रेखाटने मी मिसळपावर देखील प्रसिद्ध केली आहेत.

ही काही रेखाटने, मागे म्हणजे ५-६ वर्षांपूर्वी, सहज, मूड लागला म्हणून काढली होती. ती इथे चिकटवतो.

१. हे रेखाटन पै. मुहम्मद रफी यांच्या तरुणपणातील छायाचित्र पाहून काढले आहे.

२. हा कोण हे आपण ओळखू शकाल .... अशी अपेक्षा Smile




३. हे रेखाटन कोणा व्यक्तीचे असे नसून... ज्या वहीत चित्र काढत होतो त्या वहीच्या मागच्या पानावर काढलेले होते.
एरव्ही मी आधी डोळे रेखाटून मग उरलेला चेहरा पूर्ण करायचो. या चित्राच्या वेळी मी शास्त्रीय पद्धतीने म्हणजे कच्चे चौकोन काढून त्याच्या अनुषंगाने पूर्ण चित्र काढायचा प्रयत्न केला.



पुस्तकविश्व : पुस्तकवेड्यांसाठी एक मस्त कट्टा

इतके दिवस मिपा वर पुस्तक्विश्वची माहिती दिसत होतीच. पण कधी फिरकलो नाही तिकडे. कालच तिथला सदस्य झालो आहे.

पुस्तकविश्व अर्थात http://pustakvishwa.com हे जालावरील आणखी एक मराठी संस्थळ खास पुस्तक्वेड्यांसाठीचं. इथे प्रत्येक सदस्य आपण वाचलेल्या पुस्तकांची आणि त्यांच्या लेखकांची माहिती देतो. पुस्तकांची 'संग्रही असलेले', 'वाचलेले' आणि 'वाचायचे आहे असे' अशा प्रकारे वर्गवारी करतो ही यादी त्याच्या खात्यावर दिसते. इथे प्रत्येक सदस्याच्या खारीच्या वाट्याने पुस्तक, लेखक, प्रकाशक असा एक हळूहळू वाढतच जाणारा डेटाबेस बनू लागला आहे. म्हणजे समजा तुम्ही एखादे पुस्तक वाचले आहे आणि त्याची माहिती तुमच्या खात्यामध्ये अ‍ॅड करायची आहे, तर तुम्ही पुस्तक्विश्वच्या डेटाबेस मध्ये त्या पुस्तकाची माहीती उपलब्ध आहे की नाही ते तपासायचे, असेल तर उत्तमच नसेल तर तुम्ही स्वतः त्या पुस्तकाची माहिती पुस्तक्विश्वच्या डेटाबेस मध्ये अ‍ॅड करू शकता. म्हणजे काहिसं विकिपेडीया सारखंच.

अर्थात सद्ध्या एक अडचण जाणवली ती म्हणजे पुस्तकविश्व तितकंसं वेगवान नाही. त्यामुळे १० -१५ सद्स्य असताना सुद्धा स्पीड तितकासा मिळत नाही. :( पण आशा करूया की भविष्यात तो नक्कीच वाढेल. असो.

त्याचबरोबर  सभासद आपण वाचलेल्या पुस्तकाचे परीक्षण ही लिहू शकतात. याशिवाय पुस्तकांसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा तर आहेतच. एकूण काय, जगाच्या कानाकोपर्‍यात विखुरलेल्या पुस्तक्वेड्यांसाठी हा एक छानसा कट्टाच उपलब्ध झाला आहे असं म्हणायला हरकत नाही!

Friday, October 22, 2010

ज्ञानेश्वरांचं 'ACL Tear' झालं असतं तर?

ज्ञानेश्वरांचं 'ACL Tear' झालं असतं तर? त्यांनी काय केलं असतं? शस्त्रक्रिया आणि मग रोज मन लावून व्यायाम? तीव्र ईच्छाशक्ती दाखवून रोजच्या रोज कसरत केली असती? की 'शरीर हे नश्वर आहे आणि हे तर सर्व भोग आहेत' असं म्हणून आहे ती सेदना अनुभवण्यात आनंद मानून दैनंदीन कार्य केलं असतं?

मैत्री म्हणजे नक्की काय?

दोन व्यक्ती... त्यांना एकमेकांत काहीतरी कॉमन सापडतं, शेअर करण्यासारखं; त्यामुळे ते एकत्र वावरतात. हे जे काही शेअर करण्यासारखं असतं ते फारच महत्त्वाचं असेल किंवा somehow ते इतरांशी फारसं शेअर करता येण्यासारखं नसेल तर ते आणखी जवळचे मित्र बनतात. आणि मग त्या अनुषंगाने ते एकमेकांचे negative points एका मर्यादेपर्यंत सहन करतात, इतकंच!

म्हणजे उद्या तीच 'sharebale' गोष्ट शेअर करायला दुसरं कोणी सापडलं ( with less negative points ) तर ती आधीची मैत्री पांचट वाटणार. आणि आता तर त्याची एकमेवता ( exclusivity ) संपली. हा हा! friendship. What bull****

Wednesday, July 21, 2010

Inception पाहिल्यावर

Inception पाहून आलो.फंडू आयडीया आणि तेवढंच फंडु सादरीकरण.
एक गोष्ट साध्य करण्यासाठी काही जण स्वप्ननिर्मिती  करतात. मग त्या स्वप्नात परत आणखी एक स्वप्न. परत त्यात आणखी एक स्वप्न.... असं कितीही लांबवता येईल. एका स्वप्नातील घटनांचं कारण = ते स्वप्न पाहणार्‍या व्यक्तीच्या संकल्पना, त्याचं प्रोजेक्शन. आणि मग त्या अनुषंगाने पात्रं आणि त्यांची थोडीफार पार्श्वभूमी. सिनेमा Sci-Fi  असल्याने तसा स्टोरी ला तितका अर्थ नाहीच. मुख्य म्हणजे सिनेमाची मध्यवर्ती संकल्पना; त्यात वापरलेले काही real life मधले तर्क, जे ऐकून आपल्याला आपल्या reality बद्दल सुद्धा शंका येऊ शकते. जसं की:


१. आपल्याला स्व्प्नाची सुरुवात फारशी आठवत नाही. जे काही ठळकपणे आठवतं किंवा अनुभवास येतं ते सुरुवात आणि शेवट याच्या मधलं कुठलंतरी असतं.
२. पाच मिनीटांसाठी बघितलेल्या स्वप्नात आपण कित्येक तास, दिवस जगतो.
३. Any kind of free falling situation wakes you up.


ही कल्पना आपल्या वेदांतात सागितलेल्या कल्पनेशी काहीशी सुसंगत वाटते. म्हणजे आपण जे काही जगतो आहोत, जे काही अनुभवतो आहोत, तो केवळ मायेचा खेळ आहे, आभास आहे. जणू काही एक स्वप्नच. मग आता हे स्वप्न पाहणारा कोण? म्हणजे समजा मी आत्ता जे जगतोय ते एका स्वप्नातील स्वप्नात पाहिलेलं एक स्वप्न जरी असेल, तरी कुठेतरी हे स्वप्न पाहणारा कोणीतरी एकमेव असणार. मग प्रशन असा आहे की तो असं स्वप्न का पाहतोय?


आणि जर खरंच असं काही स्वप्न वगैरे खरं असेल तर मग माझा रोल काय? मला जे वाटतं, मग ते सुख असो वा दु:ख, ते सगळ्म खोटं? निरर्थक?  ऑ???


मेडीटेशन / ध्यान आपल्याला ह्या स्वप्नातून जागं करायचं काम करत असेल का? आणि जर हे आयुष्य हे एक स्वप्न असेल तर ते कुणीतरी प्रोजेक्ट केलंय. म्हणजे माझ्या कुठल्याही वागण्यावर माझा अ‍ॅक्टुअली कंट्रोल नाहीच असंच म्हणावं लागेल! चायला हे म्हणजे अतीच झालं! म्हणजे कांद्याचं कसं... पापुद्र्यामध्ये पापुद्रा, त्याच्या ही आतमध्ये आणखी एक पापुद्राच, तसं झालं.


जाऊ दे, आपलं काही खरं नाही. किंवा मग कुणाचंच खरं नाही.


( ज्या कुणी माझा गुडघा ट्विस्ट व्हावा असं प्रोजेक्ट केलं त्याचं स्वप्न भंग पावो. ;) )