Wednesday, July 21, 2010

Inception पाहिल्यावर

Inception पाहून आलो.फंडू आयडीया आणि तेवढंच फंडु सादरीकरण.
एक गोष्ट साध्य करण्यासाठी काही जण स्वप्ननिर्मिती  करतात. मग त्या स्वप्नात परत आणखी एक स्वप्न. परत त्यात आणखी एक स्वप्न.... असं कितीही लांबवता येईल. एका स्वप्नातील घटनांचं कारण = ते स्वप्न पाहणार्‍या व्यक्तीच्या संकल्पना, त्याचं प्रोजेक्शन. आणि मग त्या अनुषंगाने पात्रं आणि त्यांची थोडीफार पार्श्वभूमी. सिनेमा Sci-Fi  असल्याने तसा स्टोरी ला तितका अर्थ नाहीच. मुख्य म्हणजे सिनेमाची मध्यवर्ती संकल्पना; त्यात वापरलेले काही real life मधले तर्क, जे ऐकून आपल्याला आपल्या reality बद्दल सुद्धा शंका येऊ शकते. जसं की:


१. आपल्याला स्व्प्नाची सुरुवात फारशी आठवत नाही. जे काही ठळकपणे आठवतं किंवा अनुभवास येतं ते सुरुवात आणि शेवट याच्या मधलं कुठलंतरी असतं.
२. पाच मिनीटांसाठी बघितलेल्या स्वप्नात आपण कित्येक तास, दिवस जगतो.
३. Any kind of free falling situation wakes you up.


ही कल्पना आपल्या वेदांतात सागितलेल्या कल्पनेशी काहीशी सुसंगत वाटते. म्हणजे आपण जे काही जगतो आहोत, जे काही अनुभवतो आहोत, तो केवळ मायेचा खेळ आहे, आभास आहे. जणू काही एक स्वप्नच. मग आता हे स्वप्न पाहणारा कोण? म्हणजे समजा मी आत्ता जे जगतोय ते एका स्वप्नातील स्वप्नात पाहिलेलं एक स्वप्न जरी असेल, तरी कुठेतरी हे स्वप्न पाहणारा कोणीतरी एकमेव असणार. मग प्रशन असा आहे की तो असं स्वप्न का पाहतोय?


आणि जर खरंच असं काही स्वप्न वगैरे खरं असेल तर मग माझा रोल काय? मला जे वाटतं, मग ते सुख असो वा दु:ख, ते सगळ्म खोटं? निरर्थक?  ऑ???


मेडीटेशन / ध्यान आपल्याला ह्या स्वप्नातून जागं करायचं काम करत असेल का? आणि जर हे आयुष्य हे एक स्वप्न असेल तर ते कुणीतरी प्रोजेक्ट केलंय. म्हणजे माझ्या कुठल्याही वागण्यावर माझा अ‍ॅक्टुअली कंट्रोल नाहीच असंच म्हणावं लागेल! चायला हे म्हणजे अतीच झालं! म्हणजे कांद्याचं कसं... पापुद्र्यामध्ये पापुद्रा, त्याच्या ही आतमध्ये आणखी एक पापुद्राच, तसं झालं.


जाऊ दे, आपलं काही खरं नाही. किंवा मग कुणाचंच खरं नाही.


( ज्या कुणी माझा गुडघा ट्विस्ट व्हावा असं प्रोजेक्ट केलं त्याचं स्वप्न भंग पावो. ;) )

No comments:

Post a Comment